Taza Khabar 2 Bhuvan Bam Success

Taza Khabar 2 Bhuvan Bam Success -वसंत गावडे ऊर्फ वस्या या नावाचं पात्र भुवन बाम याने Taza Khabar या web series मध्ये साकारलं आहे. Taza Khabar season 1 हा 2023 मध्ये ऑनलाईन Disney Plus hoster वर प्रदर्शित झाला होता. 7 एपिसोड चा या web series ने सर्व नेटकरी आणि भुवन बाम चा प्रचंड मोठ्या चाहत्या वर्गाला एक वेगळीच भुरळ घातली होती .

Taza Khabar 2

Taza khabar 2 Bhuvan bam या कलाकाराने Taza Khabar 2 Bhuvan Bam Success मध्ये उत्कृष्ट काम करत प्रेक्षक वर्गाचे मन जिंकले.

Taza khabar season 1 मध्ये असलेले कलाकार –
भुवन बाम यांनी वसंत गावडे ऊर्फ वस्या, श्रिया पिळगावकर यांनी मधू , प्रथमेश परब यांनी पीटर , देवेन भोजानी यांनी मेहबूब भाई , नित्या मथुर यांनी शाझिया , शरद जोशी यांनी वसीम , शिल्पा शुक्ला यांनी रेश्मा ऊर्फ आपा , जे. डी. चक्रवर्थी यांनी अरुण कुमार शेट्टी ( पॉलिटिकल लीडर ) , अतिशा नाईक यांनी अल्पना गावडे (वसंतची आई ) , विजय निकम यांनी अशोक गावडे ( वसंतचे बाबा ) , मिथिलेश चतुरवेदी यांनी केरसी बिलिमोरिया , महेश मांजरेकर यांनी साजिद ऊर्फ किस्मत भाई , तमन्ना शर्मा यांनी जुईली , अशा रंगतदार भूमिकेत taza khabar season 1 चित्रित झाला आहे.

Taza khabar season 1 ची सांगता
Taza khabar season 1 मध्ये वसंत गावडे ऊर्फ वस्या एका सार्वजनिक शौचालयाचा मॅनेजर असून तो गरिबी मध्ये जगत असतो सोबत त्याचा मित्र पीटर त्याचा सारखाच मध्यमवर्गीय असलेला दिसतो , गरिबीतून बाहेर पडण्याचा या धावपळीत वसंत गावडे याचा आयुष्यात अचानक चमत्कार घडून येतो आणि जन्म होतो taza khabar चा. या taza khabar ने वसंत गावडे आणि इतर सर्व पात्रांची आयुष्य बदलून जातात ,पण वस्या ला त्याला मिळालेल्या दैवी शक्ती चा माज येतो आणि तो एक एक करून सर्व मित्र मंडळीना आयुष्यातून बेदखल करतो. पुढे जाऊन त्याला त्याचा taza khabar news मध्ये उद्योगपती वसंत गावडे याची हत्या झाली असल्याची बातमी येते आणि इथे taza khabar season 1 chi सांगता होते.

SACHIN PILGAONKAR AND BAPPA

अखेर वर्ष भराच्या आतूर्तेनंतर Taza Khabar 2 Bhuvan Bam Success ची परती आणि सगळ्यांचा लाडक्या जावेद जाफरी यांनी केलेली नकारात्मक भूमिका –

Season 2 मध्ये आपल्याला सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी भूमिका ही जावेद जाफरी यांची असल्याचं दिसून येतं. त्यांनी केलेली खलनायकाची भूमिका आपल्या डोक्यात असलेली त्याची भूतकाळातील विनोदी भमिका विसरण्यासाठी भाग पाडते. धमाल चित्रपटातील जावेद जाफरी यांचा लक्षवेधी पात्राने लोकांना जितकं खळखळून हसवलं म्हणून तो पात्र सगळ्यांचा लक्षात राहिला. तसच taza khabar season 2 मध्ये जावेद जाफरी यांनी खलनायकाची (नकारात्मक) भुमिका उत्रकृष्ट रित्या बजावली असल्यामुळे देखील हा पात्र चाहत्याचां लक्षात राहील.

Taza khabar season 2 review –

Taza Khabar 2 Bhuvan Bam Success
Taza Khabar 2 Bhuvan Bam Success

Season 2 episode 1 मध्ये मागील भागातील जुन्या गोष्टींची आठवण करून देत, या नव्या भागाची सुरुवात होते. पण जस पहिल्या भागात वस्या मरणार असल्याची बातमी दिसून भाग संपतो. पण इथे वसंत गावडे जिवंत असून स्वतःचा जीव तो कसा वाचवतो याचं चित्रण दिसून येतं. पीटर चा मदतीने तो स्वतःला कसं वाचवतो ते लोकांना कळतं. पण वसंत कडे असलेली दैवी शक्ती त्याच्याकडे या पर्वात ल्या पहिल्या भागात नसल्याची दिसून येतं.

पुढील भागात वसंत आणि पीटर ला किस्मत भाई चे पोर उचलून घेऊन जातात. तेव्हा तो जिवंत असल्याची खबर सगळीकडे पसरते. वसंत गावडे शेवटचा भागात 500 कोटी स्वतः जिंकतो पण इतर सर्व बेटिंग मास्टर लोकांना डूबवतो. आणि यातून बाहेर येतो तो व्यक्ती ज्याचे सर्वाधिक नुकसान झालेले असते. पैशाने आणि ईज्जतीने.. हा व्यक्ती दुसरा कोणी नसुन युसुफ अकतर ( जावेद जाफरी) हा असतो. त्याला झालेल्या नुकसान भरपाई साठी तो वसंत आणि पीटर ला पकडुन आणतो.

तो त्यांचा जीव घेणारच असतो की वसंत त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याची कबुली देतो. पीटर त्याला रोखत असतो की नको खोटं बोलू वैगरे पण वस्या ऐकत नाही. युसुफ त्याला जीवे मारणार तितक्यात वस्या त्याला एक taza khabar सांगतो. युसुफ ला ते खोटं वाटतं तो त्याला मारण्यासाठी शस्त्र घेतो आणि तेव्हढ्यात जी Taza Khabar 2 Bhuvan Bam Success वस्या देतो ती खरी ठरते आणि युसुफ थांबतो. युसुफ त्याचा वर विश्वास ठेऊन त्याला १५ दिवसात 600 कोटी परत कर नाही तर तुला मारून टाकेन अशी धमकी देतो.

पुढे हे 600 कोटी परत करण्यासाठी वसंत त्यांचा सर्व जुन्या मित्रांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा प्रियसीला भेटतो. या सगळ्यात पैसे देण्याचा प्रयत्नात त्याच्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात, ज्या युसुफ ला पटत नाही आणि तो प्रत्येक चुकिमागे 100 कोटी ते 500 कोटी अजून चे मागतो. हे सगळ घडत असताना वस्या मधूचा मदतीने एका ठिकाणाहून 900 कोटी मार्केट व्हॅल्यू असलेल्या दोन पेंटिंग्ज युसुफ ला देतात आणि हा मॅटर close होणार असल्याचं दिसतं पण इथेच स्टोरी मध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट घडतो.

वसंत गावडे चा आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट या मधून हिरावली जाते. या मुळे कथानक वेगळचं वळणं घेतं. यात आपल्याला वसंत आणि त्याचा वडिलांचं वेगळं नातं सुद्धा दिसुन येतं. स्टोरी चा शेवटी वसंत आपा ची मदत घेण्याचा प्रयत्न करतो पण ती सुद्धा युसुफ सोबत सामील असते , मग वसंत युसूफ ला कसे पैसे देतो यांची रंगतदार क्लाइमॅक्स ची कथा तुम्हाला पुढे काय होईल याचा विचार करायला भाग पाडते.

यात वसंत गावडे आणि युसूफ यांचात ॲक्शन सीन सुद्धा घडलेला दिसून येतो . आणि शेवटी युसुफ आणि वसंत गावडे ऊर्फ वस्या यांच्यातला संघर्ष संपतो. पण शेवटचा एपिसोड मध्ये एक बकरीचा सीन आहे. तुम्ही सोन्याची अंड देणारी कोंबडी पहिली असेल पण करोडोची लॉटरी देणारी बकरी या भागाचा शेवटी तुम्हाला दिसेल.

या भागात सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे. दिग्दर्शन ही खूप च प्रभावी असल्याचं आपल्याला लक्षात येईल. अजून बोलायचं झालं तर एडिटिंग , कलर ग्रेडिंग , visual effects, sound vaigre सगळं काही उत्कृष्ट पणे साकरालं आहे. स्टोरी खूप strong असल्यामुळे प्रेक्षक वर्ग यात अडकून राहतो. प्रत्येक एपिसोड हे जरी 30 मिनिटांचे असले तरी ते पाहताना कधी वेळ निघून जाते आणि आपण त्यात विरहून जातो ते कळत नाही.

वेब सिरीज पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा – https://www.hotstar.com/in/shows/taaza-khabar/1260126094/hisaab/1271329429/watch

Taza khabar season 3 will come or not –

खरतर taza khabar season 2 चा शेवटचा भागात सीझन 3 येणारं असल्याचा एक सीन दाखवला आहे. पण तो भाग कसा असेल आणि त्यात वसंत गावडे कडे ती दैवी शक्ती असेल की नाही किंवा असली तर काय घडेल व नसली तर वसंत गावडे च आयुष्य कस असेल अशा बऱ्याच प्रश्नांनी तुम्ही या web series चा शेवटचा भागातून बाहेर पडता यात काही शंका नाही.

Taza khabar season 2 Disney Plus hoster वर 27 September, 2024 रोजी प्रदर्शित झाला असून या सीझन 2 ने success ची उंची कायम ठेवल्याचं दिसण्यात येत आहे. Taza Khabar 2 Bhuvan Bam Success चा या succes साठी सर्व कलाकार आणि मान्यवर आणि तंत्रज्ञ यांना खूप शुभेच्छा…

5 thoughts on “Taza Khabar 2 Bhuvan Bam Success”

  1. Pingback: Singham Again

Leave a Comment