Singham Again – सिंघम अगेन या चित्रपटाच नुकताच ट्रेलर यूट्यूब या माध्यमावर प्रदर्शित झाला. सिंघम अगेन च्या ट्रेलर ने संपूर्ण सोशल माध्यमावर एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळत आहे. यूट्यूब वरील ट्रेलर लॉंच ला रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांचा चाहत्या वर्गातून जोरदार पसंती मिळतान दिसत आहे.
सिंघम हा चित्रपट २०११ रोजी पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता . सिंघम या चित्रपटात अभिनेता अजय देवगण यांनी इंस्पेक्टर बाजीराव सिंघम हे पात्र साकारल होत. तर काजल अग्रवाल यांनी काव्या भोसले नावाच महाराष्ट्रियन पात्र साकारल होतं . एकंदरीत पाहायला गेलो तर रोहित शेट्टी यांचा चित्रपटात आपल्याला मराठी आणि हिन्दी भाषेच मिलन फार सुंदरपणे दिसून येईल.
Singham Again आणि दिग्गज कलाकार
सिंघम या चित्रपटात मराठी भाषा वापरलीच पण सोबत मराठीतले दिग्गज कलाकार यात काम करताना आपल्याला दिसले. या दिग्गज कलाकारांची नाव सांगायची झाली तर एक मोठी यादी आपल्या समोर येईल. या कलाकारांचा यादीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( मेघा कदम ), सचिन खेडेकर (गौतम भोसले as गोट्या ), सूचित्रा बांदेकर ( सूचित्र भोसले ), गोविंद नामदेव (माणिकराव सिंघम ), मेघना वैद्य (लता सिंघम ), अशोक सराफ (हेड कॉंस्टेबल प्रभू सावळकर ), प्रदीप वेलणकर ( DGP विक्रम पवार ), अनंत जोग (मिनिस्टर अनंत नारवेकर ), विजय पाटकर (हवालदार रमेश केळकर) , जयंत सावरकर (कमलकांत भोसले ), सुहासिनी देशपांडे (सुहासिनी भोसले), किशोर नांदलसकर (अनंत प्यून )आशा मोठ्या कलाकारांची साथ होती.
Read This हे वाचा – https://linkofentertainment.com/paani-adinath-kothare/
Singham Again आणि गाजलेला खलनायक
सिंघम चित्रपटात सर्वात जास्त गाजलेली भूमिका अभिनेते प्रकाश राज यांनी साकारली. जयकांत शिकरे या पात्राने नकारात्मक भूमिका असून प्रेक्षकांचा मनात एक वेगळे घर केले. शॉक लगा, शॉक लगा ,शॉक लगा आणि आली रे आली आता तुझी बारी आली. हा डायलॉग कानावर पडताच जयकांत शिकरे च पात्र डोळ्यासमोर उभ राहतं, अतिशय उत्कृष्ट रित्या अभिनय करून अभिनेते प्रकाश राज यांनी लहानग्या पासून थोरा पर्यंत सगळ्यांना आवडलं होतं .
पुढे सिंघम रिटर्न्स हा चित्रपट २०१४ रोजी प्रदर्शित झाला , भाग दुसरा आणि इंस्पेक्टर सिंघम DCP सिंघम म्हणून लोकांसमोर दिसले. पहिल्या भागात काजल अग्रवाल या मुख्य भूमिकेत पहायला मिळाल्या तर या भागात अभिनेत्री करीना कपूर यांची मुख्य अभिनेत्री म्हणून एंट्री झाली.
दुसऱ्या भागात ही मराठी कलाकारांनी जोरदार हजेरी लावून चित्रपट एक उत्कृष्ट शैलीचा घडला होता. दुसऱ्या भागात महेश मांजरेकर (C. M विक्रम अधिकारी), सोनाली कुलकर्णी (मेनेका रेड्डी ), अश्विनी काळसेकर (जर्नलिस्ट मीरा शोरए ) उदय टीकेकर (कामत ), समीर धरमधिकारी (किशोर कामत ), जितेंद्र जोशी (आशीष कुमार ),छाया कदम आणि स्मिता तांबे अशा सर्वोत्कृष्ट कलाकारांनी काम केले आहे.
follow us on – https://www.instagram.com/linkofentertainment/
Singham Again सोबत दया
दुसऱ्या भागात लक्षवेधी अभिनेता ठरला दयानंद शेट्टी . कारण दया या भूमिकेत प्रेक्षकांनी दयानंद शेट्टी यांना C . I . D या कार्यक्रमात पाहिले होते. त्यामुळे दया हे पात्र लोकांना आधीपासूनच माहीत होते, पण दया हे पात्र पहिल्यांदाच सिनेमात पाहायला मिळणार या बातमिने दयानंद शेट्टी यांचा मोटहजा चाहता वर्ग असल्याच बघायला मिळालं होतं.
सिंघम रिटर्न्स या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांनी गुरुजी गुरुकान्त आचार्य ही भूमिका साकारली होती. तर अमोल गुप्ते यांनी या चित्रपटात नकारात्मक पात्र ( सत्याराज चंदेर उर्फ बाबाजी ) ही भूमिका स्वीकारली होती.
Singham Again वा सिंबा
त्यापुढे २०१८ साली सिंबा हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला आला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सुपर energetic अभिनेता रणवीर सिंग इंस्पेक्टर संग्राम भालेराव as a simmba म्हणुन पहायला मिळाला . त्याचा सोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री सारा अली खान शगून साठे या भूमिकेत होत्या. या चित्रपटाला रणवीर सिंग सोबत जय अभिनेत्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली तो अभिनेता आपला लाडका सिद्धार्थ जाधव उर्फ सिद्धू होता. अभिनेता सिद्धार्थ यांनी या चित्रपटात सब-इंस्पेक्टर संतोष तावडे हे पात्र सादर केल होतं .
Read This हे वाचा – https://linkofentertainment.com/taza-khabar-2-bhuvan-bam-success/
मराठी कलाकार
पुन्हा नवा चित्रपट आणि पुन्हा रोहित शेट्टी यांनी मराठी कलाकारांची पसंती दर्शविली, या भागात वैदेही परशुरामी (आकृति दावे ), सूचित्रा बांदेकर (mrs. मोहिले ), अश्विनी काळसेकर , नेहा महाजन ( काव्या सिंग ), सरिता जोशी ( भारती रानडे ), अरुण नलावडे , किशोर नांदलास्कर, विजय पाटकर, अशोक समर्थ ,उदय टीकेकर , उमाकांत पाटील या सगळ्या दिग्गज कलाकारांनी भरलेला होता. या भागात अभिनेता सोनू सूद यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. तर त्यांचा सोबत सौरभ जोशी यांनी सुद्धा नकारात्मक पात्र साकारल होतं.
रोहित शेट्टी आणि पोलिस Singham Again
रोहित शेट्टी आणि पोलिस हे एक वेगळंच प्रेम पाहायला मिळतं , म्हणून की काय पुढे जाऊन सूर्यवंशी हा नावाकोर चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला आला. सूर्यवंशी या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते, तर मुख्य अभिनेत्री म्हणुन कतरीना कैफ यांची निवड करण्यात आली होती. सूर्यवंशी या भागात जॅकी श्रॉफ्फ यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. सोबत गुलशन ग्रोवर , अभिमन्यु सिंग , निकितीन धीर , कुमुद मिश्रा , जावेद जाफरी , विवाण भातेणा आणि इतर सहकलाकार पाहायला मिळाले.
रोहित शेट्टी यांनी मुंबई पोलिस खात्यावर असलेल प्रेम व्यक्त करत आता सिंघम अगेन या चित्रपटची घोषणा केली. चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून प्रेक्षकांची मोठी पसंती पाहायला मिळाली आहे. या भागात देखील मराठी कलाकार असतील यात काही वाद नाही. ट्रेलर पाहून रामायण पुन्हा एकदा घडलेल दिसत आहे, भारत आणि श्रीलंका या दोन देशांचा इतिहास पुन्हा या चित्रपटाद्वारे दर्शवणार असून रावण आणि रामाचं युद्ध या युगात ही कस जिंकलं असेल हे या चित्रपटात दिसेल.
चित्रपटाचे ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा – ( credit Youtube )
3 thoughts on “Singham Again”