“Scam 1992 Web Series The Harshad Mehta Story – Plot, Details, and Audience Impact”

“Scam 1992 Web Series” स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेब सिरीज भारतातील आर्थिक घडामोडी, शेअर बाजार आणि 1992 मधील भव्य आर्थिक घोटाळ्याच्या सत्यघटनेवर आधारित आहे. हंसल मेहताच्या दिग्दर्शना खाली बनलेल्या या सिरीजने भारतीय प्रेक्षकांना शेअर बाजाराचे गुंतागुंतीचे जग आणि हर्षद मेहता नावाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली. सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सिरीजने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळवली.

हर्षदने भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि काही काळासाठी ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध झाला. परंतु त्याने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांनी शेअर बाजार कोसळला आणि देशात आर्थिक गोंधळ निर्माण झाला.ही सिरीज हर्षद मेहता यांच्या सामान्य व्यक्तीपासून ‘बिग बुल’ बनण्याच्या प्रवासावर प्रकाश टाकते. हर्षदने भारतीय शेअर बाजारात केलेली मोठ्या प्रमाणातील फसवणूक, बँक व्यवस्थेचा गैरफायदा घेतलेली रक्कम आणि त्यानंतर उघड झालेल्या घोटाळ्याने देशभरात खळबळ उडवली.

scam 1992 -the harshad mehta story
scam 1992 -the harshad mehta story thr thriller scam of finance currption

Scam 1992 हर्षद मेहता कोण होता?

हर्षद मेहता हा सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला माणूस होता, जो शेअर बाजारात क्रांती घडवून आणणाऱ्या व्यक्तींमध्ये गणला जातो. सुरुवातीला त्याने अनेक छोटी-मोठी नोकऱ्या केल्या, पण शेअर बाजाराची आवड असल्यामुळे त्याने दलाल म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि मोठ्या जोखमी उचलण्याच्या क्षमतेमुळे त्याने अल्पावधीतच नाव कमावले. तो शेअर बाजारातील नियमांमध्ये असलेल्या त्रुटी शोधून मोठ्या प्रमाणात नफा कमवू लागला. हळूहळू त्याने बँकिंग सिस्टीम आणि स्टॉक मार्केट यामधील फटी ओळखून एक मोठी फसवणूक केली, ज्यामुळे तो ‘बिग बुल’ म्हणून ओळखला जाऊ लागला

१९९२ मधील आर्थिक घोटाळा हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्टॉक मार्केट घोटाळ्यांपैकी एक मानला जातो. हर्षद मेहताने बँकांच्या व्यवस्थेत असलेल्या त्रुटींचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला. त्याने ‘बँक रसीद’ (Bank Receipts) या संकल्पनेचा वापर करून बोगस व्यवहार केले आणि शेअर बाजारात चलनवाढ निर्माण केली. त्याने खोट्या कर्जांद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी करून त्यांच्या किमती कृत्रिमरीत्या वाढवल्या, त्यामुळे इतर गुंतवणूकदारांनीही त्याच्यामागे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या घोटाळ्यात बँकांची आणि सामान्य गुंतवणूकदारांची अब्जावधी रुपयांची फसवणूक झाली.

चित्रपट , वेब सिरीज  आणि सिरियल च्या माहितीसाठी येथे भेट द्या – linkofentertainment

जर्नालिस्ट सुचेता दलालची भूमिका

हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये पत्रकार सुचेता दलाल यांचे नाव घेतले जाते. त्या आर्थिक पत्रकार होत्या आणि ‘The Times of India’ मध्ये काम करत होत्या. त्यांना हर्षद मेहताच्या संशयास्पद व्यवहारांविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी खोलवर चौकशी सुरू केली.सुचेता दलाल यांनी अनेक बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि शेअर बाजारातील व्यवहारांचा बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी २३ एप्रिल १९९२ रोजी एक लेख प्रसिद्ध केला, ज्याने देशभरात खळबळ उडवली. त्यांच्या रिपोर्टनंतर हर्षद मेहतावर चौकशी सुरू झाली आणि शेवटी तो दोषी ठरला.

स्कॅम १९९२ वेब सिरीजमध्ये अभिनेत्री श्रेया धनवंतरी यांनी सुचेता दलाल यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे भारताच्या आर्थिक व्यवस्थेत मोठे बदल घडून आले आणि बँकिंग प्रणालीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारला नवीन नियम लागू करावे लागले.

scam 1992 -the harshad mehta story
scam 1992 -the harshad mehta story

कलाकार  आणि scam 1992 ला मिळालेले पुरस्कार  

मुख्य कलाकार – अभिनेता प्रतीक गांधी (हर्षद मेहता) यांनी  हर्षद मेहताच्या व्यक्तिरेखेची प्रत्येक बाजू प्रभावीपणे व उत्कृष्ट पणे साकार  करून  सादर केली. अभिनेत्री  श्रेया धन्वंतरी (सुचेता दलाल) यांनी  निर्भीड पत्रकार ही भूमिका बजावली , ज्यांनी खरतर  या सगळ्या घोटाळ्याचा उलगडा केला. अनंत महादेवन बँक व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकारी. हेमंत खेर हर्षदचा विश्वासू सहकारी. निखिल द्विवेदी एक अर्थतज्ज्ञ आणि प्रमुख सहाय्यक भूमिका सकारल्या . कथा जितकी प्रभावी ठरली तितकीच व्यक्तिरेखा सुद्धा उत्तमपणे सकारल्या गेल्या .

अभिनेता प्रतीक गांधी यांना scam १९९२ मधील त्यांच्या भूमिकेमुळे , प्रेक्षक आणि समीक्षकां कडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली. या यशामुळे त्यांच्या कारकिर्दीत मोठे बदल घडून आले . आणि त्यांना विविध नवीन काम मिळाली. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले.

प्रतीक गांधी यांना २०२० रोजी इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता – वेब सीरिज या कॅटेगरी  साठी मिळाला .  तर फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता – ड्रामा या कॅटेगरी साठी २०२१ रोजी प्रधान केले गेले.  क्रिटिक्स चॉइस शॉर्ट्स अँड सीरिज पुरस्कार देखील  २०२१ रोजी प्रतीक गांधी यांना  सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणुन मिळाले, आणि  हिटलिस्ट ओटीटी हा पुरस्कार सुद्धा  प्रतीक गांधी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुरुष या कॅटेगरी साठी दिला गेला.

यासह ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजने एकूण १२ फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकले आहेत , ज्यात सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (हंसल मेहता आणि जय मेहता) यांचा समावेश आहे. या सोबत २०२१ रोजी SCAM 1992 सर्वोत्कृष्ट वेब सीरिज म्हणुन  दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार मिळाला .

WEB SERIES पाहण्यासाठी  येथे क्लिक  करा – SCAM 1992 WEB SERIES

 दिग्दर्शन आणि तांत्रिक उत्कृष्टता 

दिग्दर्शक हंसल मेहताच्या दिग्दर्शनाने सिरीजला एक वेगळ्या स्तरावर नेलं आहे. त्याचं काम सशक्त कथानकासोबतच, व्यक्तिरेखांच्या सूक्ष्म भावनात्मक प्रवाहाला पर्द्यावर प्रभावीपणे दर्शवितं. पटकथा आणि छायाचित्रण सिरीजच्या पटकथेने दर्शकांच्या मनावर ठसा टाकला, खासकरून १९९० च्या दशकातील वास्तविकता आणि त्या काळाच्या समाजिक परिस्थितीचा अद्वितीय दाखला. छायाचित्रणाच्या मदतीने त्या काळाचं वातावरण अत्यंत जिवंतपणे उभं राहिलं आहे.

हंसल मेहतानी रिअल-लाइफ financial घोटाळ्याची कथा तंत्रशुद्धपणे आणि गहिरेपणाने साकारली आहे. स्टॉक मार्केटच्या गुंतागुंतीच्या विश्वाचं चित्रण आणि व्यक्तिरेखांच्या व्यक्तिगत संघर्षांना प्रभावीपणे दर्शविताना त्यांचं दिग्दर्शन खूपच आकर्षक ठरलं आहे. हर्षद मेहता यांच्या उतार-चढावांच्या गोष्टीला समर्पकपणे उलगडताना, सिरीजमधील प्रत्येक क्षण, तणावपूर्ण असो किंवा चिंतनशील, प्रेक्षकांवर एक गडद छाप सोडतो. मेहताचा दिग्दर्शन शैलीने त्या काळातील आर्थिक धोरणांतील असफलतांना देखील प्रभावीपणे उजागर केलं आहे.

scam 1992 -the harshad mehta story
“RISK HAI TOH ISHQ HAI_
scam 1992 चा प्रभाव 

“स्कॅम १९९२” या वेब सिरीजचा प्रभाव मोठा होता. ही सिरीज शेअर बाजाराच्या संकल्पनांची माहिती सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिक शिक्षण दिले. ‘हर्षद मेहता’च्या घोटाळ्याची कथा आणि त्यातील आर्थिक धोरणांचे विश्लेषण, हे दर्शकांसाठी एक नवीन दृषटिकोन समोर आणले. या सिरीजने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिरीजची गुणवत्ता वाढवली, तसेच वेब सिरीजच्या संदर्भात एक नवा मानक सेट केला.

सामाजिक दृष्टिकोनातूनही, या सिरीजने भारतातील आर्थिक व्यवस्थेतील दोष आणि त्यातून होणाऱ्या धोके याबद्दल जनजागृती केली. स्कॅम १९९२ ने प्रेक्षकांना केवळ एक घोटाळ्याची कथा दिली नाही, तर आर्थिक समज वाढवून लोकांमध्ये एक नवा विश्वास निर्माण केला.

Read This हे वाचा – “पुन्हा एकदा साडे माडे ३” 

प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि रेटिंग्स 

सिरीजने प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळवला आहे. IMDb वर तिची रेटिंग ९.३/१० आहे, जी भारतीय वेब सिरीजसाठी एक अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरला आहे. या सिरीजनं आपल्या उत्कृष्ट कथानक, अभिनय, आणि दृश्यांकना मुळे एक वेगळं स्थान मिळवलं आहे.

सिरीजचे पात्रं आणि त्यांची जीवनगाथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. विविध विषयांवर आधारित असलेल्या सिरीजनं प्रेक्षकांच्या मनात ठाम ठसा सोडला आहे. यामुळे सिरीजला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, विशेषत: “सर्वोत्तम वेब सिरीज” या श्रेणीत.

Follow us on – INSTAGRAM 

सिरीजमधून मिळालेली शिकवण

या सिरीजमधून अनेक महत्त्वाचे शिकवणी मिळाल्या आहेत. पहिली शिकवण आहे “आर्थिक साक्षरता” – गुंतवणुकीचे योग्य माहिती आणि सावधगिरीचे महत्त्व. दुसरी  शिकवण “लोभाचे दुष्परिणाम” हा आहे, ज्यामध्ये अति प्राप्तीच्या इच्छेमुळे व्यक्ती कशाप्रकारे संकटात अडकतो. तिसरी महत्त्वाची शिकवण  आहे “पारदर्शकता” – आर्थिक व्यवस्थेतील पारदर्शकतेची आवश्यकता आणि त्याचा परिणाम दर्शवला आहे .

पाहण्यासाठी येथे क्लिक करा – credit – Youtube –  Sony LIV

 

Leave a Comment