Punha SADE MADE 3 कुरळे बंधु येत आहेत २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला !

Punha Sade Made 3 – पुन्हा साडे माडे तीन या चित्रपटाची घोषणा काही दिवसापूर्वी झाली. चित्रपट येत असल्याची बातमी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी त्यांचा अधिकृत इंस्टाग्राम आयडी वरून २०२४ मध्ये  शेअर केली होती .

Punha SADE MADE 3न्हा साडे माडे 3 च्या सेटवर वरील अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी काही खास फोटो शेअर करत ही गोड बातमी सर्व रसिक प्रेक्षकांना दिली होती. चित्रपटाच्या शुभ मुहूर्तावर आणि शूटिंगचा प्रारंभाला सुरुवात झालेली आहे असे या फोटो मद्ये पाहायला मिळाले.

Punha SADE MADE 3
credits – official Punha SADE MADE 3

Punha SADE MADE 3

या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून यात काही नवीन चेहरे आढळून आले. प्रामुख्याने या चित्रपटात पूर्वीचे मुख्य पात्र पद्मभूषण अभिनेते अशोक सराफ , अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते भरत जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांचां भेटीला येत आहेत. तर या पोस्ट मध्ये लक्षवेधी चेहरा ठरत आहे ती सगळ्याची लाडकी अर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता संकेत पाठक हे दोघे ही या नव्या भागात पाहायला मिळणार आहेत.

Follow us ऑन – INSTAGRAM  

17 वर्षापूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता आणि त्यावेळी या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. हा चित्रपट प्रेक्षकांचा पसंतीस उतरला होता आणि सुपर हिट सुद्धा झाला होता. चित्रपटात कुरळे बंधूची गोष्ट दाखवली आहे. कुरळे बंधू ची गोष्ट लोकांना फार आवडल्याने हा चित्रपट प्रेक्षकांचा मनात घर करून राहिला.

पहिल्या भागा प्रमाणे या भागात सुद्धा आपला लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव ऊर्फ आपला सिध्दू या ही भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या भागात सिध्दार्थ जाधव यांचा विनोदाने आणि अप्रतिम अभिनयाने  सर्व रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले होते.

Read This हे वाचा –  दिल दोस्ती दुनियादारी

चित्रपटाचे दिग्दर्शन 

SADE MADE 3 बद्दल सांगायचं झालं तर पहिल्या भागात अभिनेता अंकुश चौधरी यांनी प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. अकुंश चौधरी यांचा साडे माडे 3 हा दिग्दर्शकाच्या भूमिकेतील पहिला चित्रपट आहे. तर Punha SADE MADE 3 चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा अभिनेता दिग्दर्शक अंकुश चौधरी हे करत आहेत. सोबत चित्रपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक संजय जाधव यांच्या साथी ने होणार आहे. चित्रपटाला avk pictures, Nuclear Arrow Pictures, उदाहरणार्थ आणि अमेय खोपकर यांचा संस्थे निर्मिती मध्ये करण्यात येत आहे. तर निर्माते सुधीर कोलते , ओंकार माने आणि स्वाती खोपकर यांचा साहाय्याने होत आहे.

पूर्व भागातील कलाकार 

पुन्हा साडे माडे 3 या चित्रपटाचे लेखन संदीप दंडवते यांनी केले आहे. पहिल्या भागाचे लेखन संजय मोने यांनी केले होते.  SADE MADE 3 या चित्रपटाचा पहिल्या भागात आपल्याला बऱ्याच मोठया कलाकारांची हजेरी पहायला मिळाली होती. पहिल्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर , अभिनेत्री सुजाता जोशी , अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी , अभिनेते उदय टिकेकर , अभिनेते अरुण नलावडे , अभिनेता राहुल गोरे आणि अभिनेता सुमित राघवन यांना पाहायला मिळाले. चित्रपटातील गाणी आणि म्युझिक अजय अतुल यांनी केले होते.

Read This हे वाचा – मराठी चित्रपट

साडे माडे 3 चित्रपटातील गाणी 

SADE MADE 3डे माडे 3 या पहिल्या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांना वेड लावले होते. चित्रपटातील “ अंधाराची रात ” या रोमँटिक गाण्याने सगळेच प्रेमात पडले होते. साद गाणं भरत जाधव आणि अमृता खानविलकर यांचा वर चित्रीत झाले आहे. गॅरेज मध्ये याचं चित्रण जरी झालं असेल तरी ते पाहताना कोणीही सहज प्रेमात पडले इतके सुंदर गाणं आहे . गाण्यातील शब्द खूप गोड आणि चित्रपटाशी संबंधित गॅरेज लां धरून आहेत. गाणं नायिके सोबत गॅरेजला प्रेरित आहे. या गाण्याला गायक ऋषिकेश कामेरकर यांनी गायले आहे.

७७७ रुपये 

तर चित्रपटातील ७७७ रुपये गाणं सुद्धा अप्रतिम झाले आहे. ७७७ रुपये गाणं हे गायिका वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांनी गायले आहे. हे गाणं twicely सुमित राघवन आणि भरत जाधव यांच्यावर चित्रीत झाले आहे तर अमृता खानविलकर या गाण्यातील मुख्य पात्र आहेत.
७७७ रुपये हे गाणं एकंदरीत चित्रपटातील कथेचं मिलन आहे. गाणं हे एका स्पर्धेत घडताना दाखवलं आहे.

अजय अतुल आणि  मनाला वेड लावणारी गाणी

या चित्रपटाचे शिर्षक गीत कुणाल गांजावला यांनी गायले आहे तर अजय अतुल यांच्या म्युझिक मुळे या गाण्याला खूपच सुंदरता लाभली आहे. खरतर अजय अतुल यांच संगीत आणि त्यातली मनाला वेड लावणारी गाणी त्यांचा चाली, त्यातले शब्द सर्व काही आपसूकच आपलीशी होऊन जातात. त्यात भर म्हणजे जर ति गाणी प्रेमाची असली तर प्रेमात पडल्याची भावना उत्स्फूर्तू  लागते. असच काही पुन्हा वेड लावून घेण्यासाठी सर्व अजय अतुल प्रेमीनी सज्ज व्हा या नव्या कोऱ्या कुरळे बंधूंचा नव्या प्रेम प्रवासात प्रवाहित व्हायला.

२०२५ मध्ये भेट होणार कुरळे बंधूंची !

२०२५ या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला तसे बरेच मराठी चित्रपट भेटीला येणार आहेत. पण काही चित्रपट जुन्या नात्यां सोबत पुन्हा नाते संबंध नव्याने बांधून ठेवण्यासाठी अन्  ते प्रेमाचे नाते जपण्यासाठी येणार आहेत. तर प्रेक्षकांनो तयार आहात ना आपल्याला कुरळे बंधुना पन्हा भरभरून प्रेम द्यायला Punha SADE MADE 3 .

गाणं पाहण्यासाठी येथे क्लिक करा – credits – ZEE म्युझिक कं .

Leave a Comment