Sachin Pilgaonkar And Bappa success

Sachin Pilgaonkar And Bappa – सचिन पिळगावकर यांच्या सिनेप्रवासातील महत्वाच्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘अष्टविनायक’. अष्टविनायक चित्रपटाचा नायक म्हणून सचिन पिळगावकर यांची कशी निवड झाली , याची बातमी या लेखामध्ये सांगण्यात आली आहे. तर अष्टविनायक या सिनेमातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली. यापैकी प्रमुख गाणं म्हणजे ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’. हे गाणं कसं सुचलं? एकाही अष्टविनायक मंदिरात न जाता जगदीश खेबुडकरांनी हे गाणं कसं लिहिलं, याचा खास किस्सा यात वर्णन केला आहे.
अष्टविनायक चित्रपटापासून ते आज नवरा माझा नवसाचा २ या सिने प्रवासात सचिन पिळगावकर आणि बाप्पा अस एक अतूट नातं दिसून येतं.

Sachin Pilgaonkar And Bappa

Sachin Pilgaonkar And Bappa

अष्टविनायक चित्रपटाचं कथानक कसं सुचलं ?
चित्रपटाची कल्पना सर्वात प्रथम शरद पिळगावकर यांना सुचली , त्या काळात अनेक देवी देवतांवर चित्रपट बनत होते , परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाला केंद्र स्थानी ठेवून कोणताही चित्रपट बनला न्हवता. त्यामुळे गणपती बाप्पा ची मनोभावे पूजा करणारे शरद पिळगावकर यांनी गणपती वर चित्रपट करण्याचे ठरवले. आणि १९७८ साली या चित्रपटाला सुरुवात झाली.

या चित्रपटासाठी पहिल्यांदा कोणते कलाकार घ्यायचं ठरलं होतं व ते कसे रद्द झालं.

शरद पिळगावकर यांनी  सर्वात आधी विक्रम गोखले यांची निवड केली  होती , पण काही कारणास्तव विक्रम गोखले यांनी दिलेल्या अटी मुळे शरद पिळगावकर यांना विक्रम गोखले यांना घ्यायचा विचार सोडला आणि त्यांनी नवीन नट शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. वडिलांचा प्रयत्नांना सचिन पिळगावकर यांनी त्या भूमिकेला साकरण्या साठी पसंती दाखवली.

सचिन पिळगावकर यांनी चित्रपटात काम करण्यासाठी कोणती अट घातली होती
सचिन पिळगावकर यांनी घातलेली अट अशी की , अष्टविनायकांच्या गाण्याचा वेळी ते प्रत्येक अष्टविनायकाच्या ठिकाणी येणार , आणि कोल्हापूरला क्लोजअप काढून ते चित्रपटात जोडायचे नाही. त्यांच्या वडिलांनी, म्हणजेच शरद पिळगावकर यांनी ही अट हसत हसत मान्य केली आणि सचिन पिळगावकर अष्टविनायक चित्रपटाचे मुख्य अभिनेते ठरले.

अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं बनवताना कोणता किस्सा घडला होता

शरद पिळगावकर यांनी शांता बाई शेळके , शांताराम नांदगावकर आणि मधूसुधन कालेलकर यांचा कडून गाणी लिहून घ्यायचं ठरवलं होतं. त्यावेळी जगदीश खेबुडकर यांचा मुक्काम मुंबई मधील राम निवास येथे असल्याच शरद पिळगावकर यांना समजलं. तिथे ते एका कन्नाडी चित्रपटाचे संवाद आणि गाणी मराठी भाषेत भाषांतरित करत होते. यास दरम्यान रात्री १२.३० वाजता शरद पिळगावकर त्यांचा कडे आले. आणि अष्टविनायक चित्रपट करत असल्याचे सांगितले. परंतु चित्रपटातील क्लायमॅक्स चा गाण्यावर अडलो आहे आणि उद्या त्या गाण्याचे रेकॉर्डिंग आहे. ते गाणं तुमचा कडूनच पूर्ण होऊ शकते म्हणून मी तुम्हाला फ्लॅट वर घेऊन जाण्यासाठी आलो आहे.

पुढे जगदीश खेबुडकर यांनी गाण्याबद्दल विचारणा केली , तेव्हा गाणं हे अष्टविनायकाच्या आठ गणपती वर आधारित असून ते ग्रामीण भाषे मध्ये लोक गीताचा माध्यमातून करायचं आहे असं कळलं. त्यावेळी जगदीश खेबुडकर यांनी शरद यांना सांगितले की मी अष्टिनायकांपैकी एकही गणपती पहिला नाही तर त्या आठ गणपतीचे वर्णन कसे करणार.

Sachin Pilgaonkar And Bappa
Sachin Pilgaonkar And Bappa

तेव्हा शरद पिळगावकर यांनी त्यांचा कडे असलेलं अष्टविनायकाची माहिती असलेले एक पुस्तक त्यांना वाचायला दिलं. आणि मग शरद पिळगावकर त्यांना घेऊन जुहू मधल्या त्यांचा फ्लॅट वर घेऊन गेले. फ्लॅट वर पोहचे पर्यंत खेबुडकर यांनी संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. वाचत असताना त्यांनी गणपती चे आठ मीटर्स त्यांनी मनातल्या मनात ठरवले .

पुढे गणरायाचे नामस्मरण करून त्यांनी गाणं लिहायला त्यांनी सुरुवात केली . पहाटे ३.३० पर्यंत गाणं लिहून तयार झालं. शरद पिळगावकर यांचा म्हण्या प्रमाणे आठ गणपतींचे आठ वेगवेगळ्या लोक गीतांचा मीटर्स मध्ये लिहून झाल्यावर खेबूडकर यांनी ते गाऊन दाखवले. या गाण्याची मुख्य खासियत अशी की मराठी चित्रपटातील एकमेव मोठं गाणं अशी ओळख या गाण्याला लाभली आणि हे गाणं १६ मिनिट इतक्या लाबींच आहे.

Sachin Pilgaonkar And Bappa

तब्बल १२ वर्षा नंतर चित्रपटात बाप्पाचा आशीर्वादाने successful comeback केला.

१९९३ नंतर सचिन हिंदी सिनेसृष्टीत व्यस्त होत गेले , हिंदी सिरीयल मध्ये दिग्दर्शक, निर्मात्याची भूमिका बजावत त्यांनी त्याचे काम चालू ठेवले. हिंदी सिनेसृष्टीत व्यस्त असल्यामुळे मराठीत काम करताना बरेच अडथळे निर्माण होत होते. पण अखेर १२ वर्षांनंतर त्यांनी मराठी चित्रपट करण्याचे  ठरविले आणि पुढे comeback केला . Comeback केलेला चित्रपट दुसरा कोणता नसून आपल्या सर्व मायबाप रसिकांचा लाडका चित्रपट “ नवरा माझा नवसाचा ” हा होता. जो २००५ साली संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटात ही आपल्याला सचिन पिळगावकर आणि बाप्पा (Sachin Pilgaonkar And Bappa) यांचं सुंदर नातं दिसुन येत. सोबतीला सुप्रिया पिळगावकर , अशोक सराफ हे मुख्य भूमिकेत दिसले. बाप्पाचा आशीर्वादाने तब्बल १२ वर्षानंतर मराठी सिनेसृष्टीत परतले आणि एक सुंदर विनोदी चित्रपट या महाराष्ट्राला दिला.

पुढे आता १९ वर्षानंतर “ नवरा माझा नवसाचा २ ” या चित्रपटात पुन्हा सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी एकत्रित काम केले आहे . “नवरा माझा नवसाचा 2” वर सुद्धा प्रेक्षकांनी “नवरा माझा नवसाचा” यावर जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम वा प्रतिसाद भाग २ ला मिळत असल्याचं दिसत आहे. एकदांदरित सचिन पिळगावकर आणि बाप्पा  (Sachin Pilgaonkar And Bappa) यामागे भव्य आशीर्वाद असल्याची चर्चा ही होत आहे. सद्या मराठी चित्रपटाची फारशी कमाई होताना दिसत नव्हती, पण शेवटी जून ते सोनं ते खरच प्रत्याक्षरुपी घडताना दिसून येत आहे. शेवटी सचिन ,सुप्रिया आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनीच मराठी सिनेसृष्टीला पुन्हा एकदा वर उचलून मराठी चित्रपट सृष्टी सुद्धा कुठे कमी नाही याचं उत्कृष्ट उदाहरण दिलं .

Sachin Pilgaonkar And Bappa – गाणं पाहण्यासाठी येथे क्लिक करा – credit – saregama marathi

3 thoughts on “Sachin Pilgaonkar And Bappa success”

Leave a Comment