Prajakta Mali Phullwanti Powerful

Prajakta Mali Phullwanti “पद्मभूषण बाबसाहेब पुरंदरे” यांचा फुलवंती कादंबरी वर आधारित फुलवंती हा आगामी चित्रपट प्रदर्शित झाला आहे . सदर चित्रपटातील भूमिकेसाठी मुख्य भूमिकेत अभिनेत्री  प्राजक्ता माळी , अभिनेता गश्मिर महाजनी , अभिनेत्री व दिग्दर्शिका स्नेहल तरडे , अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक , अभिनेता वैभव मांगले , अभिनेता मंगेश देसाई, अभिनेता क्षितिज दाते यासारख्या उत्कृषट कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

Prajakta Mali Phullwanti

Prajakta Mali Phullwanti
Prajakta Mali Phullwanti ( Google Images)

सूत्र संचालन ते मुख्य अभिनेत्री  (Prajakta Mali Phullwanti )-

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी  आपल्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा यात  निवेदन सूत्र संचालन करून जशी भुरळ घातली तशीच आगळी वेगळी भुरळ घालण्यासाठी  पुनः एकदा सज्ज झाल्या आहेत . फुलवंती या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्राजक्ता माळी यांनी पदार्पण केले आहे. आजवर मराठी मालिका , सिनेमा यामधून आपल्याला दर्जेदार अभिनयाने आणि सुंदर अविस्मरणीय कला अदाकारीने  संगळ्यांच मन जिंकत आज या फुलवंतीचा प्रवासात चित्रपट निर्माती म्हणुन सुद्धा प्रवास करत आहे.

Read This हे वाचा  – https://linkofentertainment.com/paani-adinath-kothare/

दिग्दर्शिका म्हणुन पदार्पण (Prajakta Mali Phullwanti )

या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्राजक्ता माळी यांनी अक्षय तृतीया चा मुहूर्तावर सोशल मीडिया वर प्रदर्शित करून तिचा आगामी चित्रपटाची घोषणा केली होती.  या चित्रपटची खासियत अशी की सदर चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा पत्नी स्नेहल तरडे या सिनेमाचा दिग्दर्शिका म्हणून भेटीस येत आहेत. स्नेहल तरडे यांचं या सिनेमातून दिग्दर्शिका म्हणून पदार्पण होत आहे.

चाहत्यांचा शुभेच्छा Prajakta Mali Phullwanti

या सिनेमाचे दिगदर्शन जरी स्नेहल तरडे करत असल्या तरी या चित्रपटाचे संवाद लेखण प्रवीण तरडे यांनी केले आहे. फुलवंती चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षक आणि प्राजक्ता माळी यांचा चाहत्या वर्गात एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळत आहे. प्राजक्ता माळी  यांनी जेव्हा पहिला पोस्टर रिलीज केला होता तेव्हापासूनच कलाकार व मित्रपरिवार यांचा आनंद शिगेला पोहचला होता, सोबतच चाहते व नेटकारींनी तिला शुभेच्छा देऊन तिचा आगामी चित्रपटासाठी उत्सुक असल्याची पसंती दर्शवली होती.

Read This हे वाचा  – https://linkofentertainment.com/sachin-pilgaonkar-and-bappa/ 

लक्षवेधक ओळ Prajakta Mali Phullwanti –

रंगणार… पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी … आपल्या अदांनी घायाळ करायला येतेय ‘फुलवंती’ या लक्षवेधक  शब्दांनी  प्रेक्षकाना रोखून धरल होतं. Panorama Studios , मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा संयोगाने या चित्रपटाची  निर्मिती होते आहे.  तर “पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे” यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय….’फुलवंती’

"पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे" यांची गाजलेली कादंबरी -

“पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे” यांच्या गाजलेल्या फुलवंती या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित हा सिनेमा असून पेशवे कालीन महाराष्ट्रातील लावणीचा कला आणि एक सुंदर प्रेमकथा या  सिनेमा तून उलगडणार असल्याच बोलले  जात आहे .तर फुलवांती हा सिनेमा एक नर्तकी वर आधारित आहे ,फुलवंती या एका नर्तकी चा हरलेल्या पैजे मागची ही कहाणी प्रेक्षकांना नृत्य आविषकराने भुरळ घालेल यात कोणतेही दुमत नाही.

Read This हे वाचा  – https://linkofentertainment.com/taza-khabar-2-bhuvan-bam-success/

प्राजक्ता आणि अमृता -

या आधी प्राजक्ता माळी यांनी “चंद्रमुखी” या चित्रपटात लावणी केली , “चंद्रमुखी” या चित्रपटातील “सवाल जवाब” या गाण्यात आपल्याला अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांची सुंदर जुगलबंदी पाहायला  मिळली. तर “चंद्रमुखी” चित्रपटात अमृता खानविलकर यांनी उतकृष्ट अभिनय आणि नृत्य अविष्काराने प्रेक्षक व चाहत्या वर्गाचे मन जिंकले होते.

पॅन इंडिया ची घोषणा -

पॅन इंडिया असणाऱ्या फुलवंती सिनेमाची चर्चा सर्व सोशल माध्यमावर होत असून हा चित्रपट पॅन इंडिया च्या माध्यमातून प्रेक्षकांचा किती पसंतीस उतरतो हे पाहण्याची ओढ सर्वत्र पाहायला दिसत आहे.

आर्या आंबेकर आणि प्रेक्षकांना  अमूल्य भेट -

बाई ग या चंद्रमुखी चित्रपटातील गण्या नंतर आर्य आंबेकर यांनी फुलवंती या चित्रपटाचे फुलवंती हे गाणे गायले आहे.
या गाण्याचे बोल स्नेहल तरडे , विश्वजीत जोशी यांनी लिहिले आहेत. सदर गाणं प्रेक्षकांचा मनात घर करून आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांना गायन रूपी एक भेटच दिली असल्याचं आर्या चां चाहत्या वर्गा कडून बोलण्यात येत आहे.

वैशाली माडे यांचा नटखट अदा -

चित्रपटातील मदांमंजिरी हे गाणे वैशाली माडे यांचा स्वरत ऐकायला मिळेल तर गीतकार विश्वजीत जोशी आणि डॉ. प्रसाद बिवरे यांनी ते गाणे  लिहिले आहे. वैशाली माडे यांनी गाण्यात नटखट अदा मांडत चाहत्यांना नकळत प्रेमात पाडलं आहे. गाण्याची पसंती सदया सर्वत्र पाहायला मिळत असून वैशाली माडे आणि आर्य आंबेकर यांचा वर चित्रपटातील  गाण्यासाठी कौतुकाची थाप मिळत आहे.

दिग्गज छाया चित्रकार - 

फुलवंती या चित्रपटाला आणखी एका  दिग्गज कलाकाराची  साथ  लाभली आहे , असे म्हणतात जस चित्रपटाच  दिग्दर्शन महत्त्वाचं तसच चित्रपटाच  छाया चित्रण देखील तितकच महत्त्वाचं. आणि अशीच महत्त्वाची भूमिका महेश लिमये यांनी छाया चित्रकार म्हणून या चित्रपटात उचलली आहे.

महाराष्ट्राचे लाडके -

चित्रपटात आपल्याला आपले लाडके कलाकार अभिनेते गौरव मोरे , रोहित माने सुद्धा छोट्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.  महाराष्ट्रातील हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमात दोघाणी अप्रतिम काम करत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

चित्रपटाचे ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा – ( credit – Youtube)

4 thoughts on “Prajakta Mali Phullwanti Powerful”

  1. Pingback: Manapman
  2. Pingback: Pushpa

Leave a Comment