Like Aani Subscribe

Like Aani Subscribe अमेय वाघ आणि अमृता खानविलकर या उत्कृष्ट कलाकारांची जोडी १८ ऑक्टोबर ला येणाऱ्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेता अमेय वाघ यांनी यापूर्वी त्यांचा  उत्कृष्ट अभिनयाने मराठी व हिन्दी सिने सृष्टीत बऱ्याच चित्रपट आणि मालिकांनी  एक सुंदर ओळख निर्माण केली आहे.

तर अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी सुद्धा त्यांचा सुंदर अभिनय शैलीने सिने सृष्टीत एक वेगळीच भुरळ घातली आहे.  या दोन सुंदर व अभिनय शैलीने भरलेल्या जोडीचे काम येत्या १८  ऑक्टोबर  ला मराठी सिनेमातून पाहायला मिळणार आहे .

“Amey Amruta And Jui” यांचा अगामी चित्रपट Like Aani Subscribe –

Amey , Amruta and Jui
Amey , Amruta and Jui

‘Like Aani Subscribe या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची थोडी कल्पना प्रेक्षकांना दिली आहे.”Amey Amruta And Jui” “लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट फक्त एक रहस्यमय कथा नसून आजच्या तरूणाईची कथा सांगणारा चित्रपट आहे. प्रत्येळ वेळी चित्रपटाची कथा एक वेगळे वळण घेणारी असून प्रेक्षकांना खूर्चीला खिळवून ठेवणारी आहे.”

या चित्रपटात प्रत्येक पात्राचे ध्येय वेगळे असले तरी त्यांचे आयुष्य एकाच ठिकाणी येऊन थांबते. हे सर्वात मोठे रहस्य चित्रपटाची उत्सुकता वाढवते . सोशल मीडिया चा या जगात नेटकरी आणि जगात घडणारा तिसरा गुन्हा scam यावर भाष्य करणारा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Like Aani Subscribe चित्रपटाची चर्चा  सोशल मीडिया माध्यमावर   – 

गेल्या काही दिवसांपासून ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाची चर्चा   यांची सोशल मीडिया माध्यमावर रंगली आहे. अभिनेत्री अमृता  खानविलकर आणि अमेय  वाघ महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर ने अंगावर शहारा आणल्याने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लाईक आणि सब्स्क्राईब प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे. खरतर सोशल मीडिया आणि वास्तविकता योग्यापाणे मांडणार आणि सोशल मीडिया सारख्या विषयवार भाष्य करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याच प्रेक्षकांमध्ये म्हणटलं जातंय .

Like Aani Subscribe

‘Like Aani Subscribe’ हे शब्द आपण सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ऐकतो आहोत . त्यामुळे हा शब्द सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये खूप सर्वसामान्य आहे. अनेकदा सोशल मीडियावर व्हिडिओ बघत असताना किंवा रिल बघत असताना ‘Like Aani Subscribe तर हमखास ऐकलाच असेल.  पण लाईक आणि सब्स्क्राईब या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये निरीक्षणपूर्वक  पहिलं तर लक्षात येईल की, जुई  भागवत एका व्लॉगरच्या भूमिकेत दिसत असून, ती एका संकटात अडकल्याचे दिसतेय.

ट्रेलरमध्ये कोणाचा तरी खून झाल्याचेही दिसत आहे. तर Amruta खानविलकर पोलिसांच्या मदतीने कोणत्यातरी रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेय  वाघ कडे ही काहीतरी गुपित असल्याचे दिसत आहे.

Read This हे वाचा – https://linkofentertainment.com/prajakta-mali-phullwanti-powerful/

Like Aani Subscribe चित्रपटाचे संकलन –

लाईक आणि सब्स्क्राईब चित्रपटाचे संकलन इतक्या दीमाखपूर्व पद्धतीने केले आहे की , लोकांना अथवा संपूर्ण प्रेषक वर्गाला विचार करण्यास भाग पाडले आहे, ट्रेलर संकलनासाठी  संकलक अनिकेत काले यांचे कौतुक करावे तितके कमीच. “Amey Amruta And Jui”  दिग्दर्शक अभिषेक मेरुकर यांनी बांधलेली कथा प्रेक्षकांना १८ ऑक्टोबर ला उलगडणार आहे.

चित्रपटाचे निर्माते -

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘Like Aani Subscribe’ चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अभिनेता अमेय  वाघ,  अभिनेत्री अमृता  खानविलकर, अभिनेत्री  जुई भागवत,  अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेता विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read This हे वाचा – https://linkofentertainment.com/paani-adinath-kothare/

अभिनेत्री  जुई भागवत –

अभिनेत्री जुई भागवत या गायिका आहेत ,  कोकण कन्या बॅन्ड  या ग्रुप मधून त्यांनी गाण्याचा प्रवास केला आहे. जुई भागवत यांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. नवीन कलाकार म्हणुन या चित्रपटात काम करून त्यांनी त्यांचा आवडीचा कला कारानसोबत काम करून खूप मज्जा आली अशी प्रतिक्रिया त्यांनी एक मुलाखती मध्ये सांगितलं .

चित्रपटातील मंडळी  -

Like Aani Subscribe या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केले आहे, चित्रपट लेखन सुद्धा अभिषेक मेरुकर यांनी केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण गौरव  कुलकर्णी यांनी केले आहे. संकलणं अनिकेत काले यांनी केले आहे. संगीतकार सुयश केळकर आणि अमितराज हे आहेत. चित्रपटातील गाणी सुद्धा एक चर्चेचा भाग ठरला आहे. कारण चित्रपटात एक आयटम सॉन्ग आहे.

Read This हे वाचा – https://linkofentertainment.com/singham-again/

लिंबू फिरवला-

चित्रपटात एक आयटम साँग आपल्याला  सद्या सोशल मीडिया वर प्रचंड आवडीत येताना दिसत आहे. या गाण्यावर गौतमी पाटील यांनी नृत्य केला आहे . गौतमी पाटील यांच्या नृत्याने या चित्रपटाला एक वेगळच वळण घेताना दिसते आहे. अभिनेता अमेय वाघ आणि गौतमी पाटील यांची जुगलबंदी या गाण्यावर होताना दिसत आहे. लिंबू फिरवला हे गाण गायिका वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांच्या आवाजात गायलेले आहे, तर लीरिक्स क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत.

या चित्रपटातील दुसरे गाणे आपलोड करून टाक सुद्धा सोशल मीडिया वर वायरल  होताना दिसतंय , क्षितिज पटवर्धन यांनी सद्यच्या सोशल मीडिया चे वा या नव्या जगाचे खूप सुंदर वर्णन या गाण्यात केले आहे. या गणायला कस्तूरी वावरे यांनी अतिशन सुंदर स्वरात गायले आहे.

Read This हे वाचा – https://linkofentertainment.com/squid-game-2-announce/

या चित्रपटातील मर्डर मिस्ट्री किंवा  scam की अजून नवीन काही तरी , नवीन गोष्ट उलघडते हे या चित्रपटाला बघितल्या नंतर च  कळेल. Like Aani Subscribe आणि अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांची ही रोमांचक गोष्ट येत्या १८ ऑक्टोबर ला जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होणार  आहे. प्रेक्षकांना पडलेल्या प्रशांची उत्तर दिग्दर्शक अभिषेक मेरुकर यांनी कशाप्रकरे या चित्रपटात मांडले आहे हे बघणे खूप उत्सुकतेचा भाग ठरला आहे.

चित्रपटातील गाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा –

 

4 thoughts on “Like Aani Subscribe”

  1. Pingback: Pushpa
  2. Pingback: Manapman

Leave a Comment