Dil Dosti Duniyadari (2024)

Dil Dosti Duniyadari – मराठी सिने मालिकांमध्ये अजरामर ठरलेली एकमेव अद्वितीय मालिका दिल दोस्ती दुनियादारी. या मालिकेने लोकांना वा प्रेक्षकांना मालिकाच नाही तर एक कुटुंब , एक प्रेम , एक आपुलकी, एक जिव्हाळा दिला . मैत्रीच्या दुनियेला मानाचा मुजरा दिला.

अस म्हणतात आयुष्यात मैत्री शिवाय काहीच नाही. मैत्रिशिवाय आपल आयुष्य अधुर आहे. कारण आपल्या कुटुंबा नंतर किंवा त्यांचा आधी आपल्या बद्दल ज्यांना सगळ काही माहीत असतं ती म्हणजे आपली मित्र . आपण एकवेळ कुटुंबा समोर सहज खोटं बोलू शकतो. पण मित्रांसमोर खोटं बोलणं तितकं सोपं नाही. कारण मैत्रीत काहीच लपवलं जात नाही. निखळ पाण्यासारखी असते ती मैत्री.

Dil Dosti Duniyadari

Dil Dosti Duniyadari
Dil Dosti Duniyadari

याच मैत्री वर भाष्य करणारी गोष्ट २०१५ रोजी आपल्या सगळ्यांना भेटायला आलेली मालिका म्हणजे Dil Dosti Duniyadari . जिने असंख्य कुटुंबीयांचा मनात घर केले आणि आज पण ते त्या मनावर आधिराज्य गाजवत आहेत. मालिका जुन्या होतात पण मित्र नाही. मित्र नेहमी ताजेतवाने असतात, कितीही शिळे झाले तरी. तशीच ही मालिका अजून ही जिवंत आहे आपल्या सगळ्यांचा मनात आणि हककाच स्थान करून आहे हृदयात.

Follow us ऑन – INSTAGRAM  

निव्वळ TRP म्हणून किंवा मालिका या उद्देशाने जर ही  Dil Dosti Duniyadari  मालिका सुरू झाली असती तर कदाचित ही मालिका आजवर अजरामर ठरली नसती, पण लेखकांनी लिहिलेले पात्र, त्यातली हवी हवीशी वाटणारी माणसं वा मित्र आपल्याला त्या मालिकेला पाहताना आपण ही त्यांचा मधलेच एक आहोत अशी जाणीव करून देते.

Read This हे वाचा – Pushpa

Dil Dosti Duniyadari आणि ६ मित्र –

मालिकेची गोष्ट तशी साधी सोपी , अगदीच सांगायचं झालं तर ६ मित्रांची. मुंबईमध्ये राहत असणाऱ्या आणि आयुष्याच्या धडपडीत स्वतःला आणि कुटुंबाला सावरुन सेटल होण्याचा प्रवाहात झोकून देणाऱ्या आणि आपल्या घरा पासून दूर राहणाऱ्या बॅचलर मित्रांची ही कथा Dil Dosti Duniyadari . तस बघायला गेलो तर बॅचलर हा शब्द जरी ऐकला तरी पूर्वी लोक त्यांचा मुलांना त्यांचा पासून दूर करायला घाबरायचे. कारण बॅचलर म्हणजे टाइमपास , वाया गेलेली मुले ,जुगारी , उनाडग्या करत फिरणारी आणि ज्याचं आयुष्यच अर्थशून्य होत अशी ओळख लोकांचा मनात भरलेली होती.

FOR MORE ARTICLES VISIT ON – WWW.LINKOFENTERTAINMENT.COM

कदाचित ही ओळख खरी असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा. कारण प्रत्येकजण हा बरोबर पण असू शकतो असं नाही आणि चुकीचा ही असू शकतो असं नाही. प्रत्येकाची आपली एक वेगळीच छाप असते. त्यात भर म्हणजे स्वतःच आयुष्य कसं जगावं ही निवड ज्याची त्याची प्रत्येकाची वयक्तिक असते.

पण २०१५ नंतर लोकांच्या विचारात परिवर्तन घडून आले. लोकांचे विचार बदलले , विचारधारा बदलल्या आणि त्याच सर्व श्रेय हे Dil Dosti Duniyadari या अजरामर मालिकेला , मालिकेच्या दिग्दर्शकांना , लेखकांना , निर्मात्यांना आणि अर्थातच मालिकेतील सहा कलाकार आणि इतर सर्व मान्यवरांना जातं. त्यांनी दिलेल्या या अविस्मरणीय कलेचा भाग आपण प्रेक्षक म्हणून घडलो त्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत.

Read This हे वाचा – Manapman

Dil Dosti Duniyadari मालिकेचे लेखक दिग्दर्शक आणि गायक –

Dil Dosti Duniyadari या मालिकेचं दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांनी अप्रतिम दिग्दर्शन केले आहे. तर संजय जाधव या मालिकेचे निर्माते आहेत. मालिकेची कथा संजय जाधव आणि आशिष पात्रे यांची आहे , तर पटकथा आणि संवाद लेखन आशिष पात्रे आणि अमोल पाटील यांनी लिहिले आहेत. मालिकेचं शीर्षक गीत गायिका आर्या आंबेकर, जुईली जोगळेकर आणि सागर फडके यांनी गायले आहे.
मालिकेची निर्मिती ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हन एन्टरटेन्मेंट या संस्थेने केली आहे .

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि भुरळ घालणारी ही मालिका आज पण ही मालिका आवर्जून परत परत पाहतात. कारण त्यातले पात्र , त्यातली गोष्ट , मित्रांची मस्ती , आणि विनोदाची अचूक वेळ मांडत घडलेला विनोद आणि चटकन खूप काही शिकवून जाणारे प्रसंग यामुळे ती मालिका लोकांना आपलसं करून ठेवते.

Read This हे वाचा – Raja Rani And Dharma

Dil Dosti Duniyadari मित्रांची ओळख –

Dil Dosti Duniyadari  मालिकेतील कलाकरांबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता सुवरत जोशी यांनी सुजय साठे उर्फ स्कॉलर या पात्राची भूमिका साकारली होती पण तो असा मित्र ज्याने हुशार असल्या सोबत घराला ही कसं सांभाळायचं ते शिकवलं. अभिनेता अमेय वाघ यांनी कैवल्य कारखानीस उर्फ kk या पात्राला जगले आहे , हा पात्र खरतर खूप अवली, स्वतःचा करमणुकीची पोळी दुसऱ्याचा मस्करीत भाजून ती स्वतः खात इतरांना वाटणारा एकमेव मित्र.

अभिनेता पुष्कराज चिरपुटकर यांनी आशुतोष शिवलकर उर्फ आशू हा पात्र तर आपल्यातला च एक असल्याचं भासवले आहे , आपल्या प्रत्येक ग्रुप मद्ये इंग्रजी बोलण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असतो , पैशांचा भानगडीत अडकलेला असतो , त्याचा इतिहास वेगळा असतो पण तो साधा आणि घाबरट असल्याचं भासावतो तो हा , सोप्या भाषेत ओळख दयायची झाली तर एवढंच म्हणेन Everybody on the dance floor, माझ्या chonfidence ने तुम्ही मला ओळखलं च असेन यात काही वाद नाही. (सुजय – आशू chondfidence नाही रे confidence च नाही क, काय करायचं याचं.. आशू हा that one )

Dil Dosti Duniyadari
Dil Dosti Duniyadari

Dil Dosti Duniyadari स्त्री भूमिकेतील सगळ्याची लाडकी रेश्मा इनामदार (पाटील) अर्थात अभिनेत्री सखी गोखले यांनी रडून आणि नाश्त्याला पोहे बनवून प्रेक्षकांचा मनात एक वेगळीच जागा निर्माण केली .पण तिची कथाच वेगळी , सुगरण आणि समजूतदार गोड मैत्रीण ती आहेच पण ती M A English आहे बर का, ते विसरू नका.. फ्कत तिच्या समोर राकेश च नाव काडू नका म्हणजे झालं . का ते तुम्हाला माहीतच असेल ..

हे झालं पण प्रत्येक ग्रुप मध्ये एक डॉन असतो पण इथे असतो नाही तर असते होती, ती म्हणजे सगळ्याची आपली दादागिरी करून पण प्रेमाने जग जिंकणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर अर्थात मिनल शेवाळे . भेंडी म्हणजे भाजी नाही तर मिनल ची शिवी आहे हे लक्षात ठेवा, अभिनय तिचा आवडीचा विषय आणि कबीर हा तिचा नाजूक विषय .

आणि या घरातील सगळ्यात गोड ,निरागस , थोडी मूर्ख पण जिच्या शिवाय हे घर सुद्धा तितकंच अपूर्ण आहे जितकं जेवण मिठाशिवाय . हा फक्त तिचे पासवर्ड वैगरे ती सगळ एका डायरीत लिहून ठेवते, बिचारी विसराळू आहे ना म्हणुन. तिची उंची तीच ते गोंडस रूप आणि खट्याळ वृत्ती सगळ्यांना ती किती महत्त्वाची आहे ते सांगते. या सुंदर पात्राला आमच्या आयुष्यात आणणारी अभिनेत्री पूजा ठोंबरे ऊर्फ आपली लाडकी एना म्याथुस या सगळ्याच कलाकारांनी अभिनयाने आणि या सुंदर कथेने आपल्याला समृद्ध केले .

Read This हे वाचा –  Like aani Subscribe

खऱ्या आयुष्यात नकळत जन्मले –

Dil Dosti Duniyadari ya मालिकेचे एकूण ३०१ भाग प्रदर्शित झाले. पहिला भाग जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा ते प्रत्येक प्रेक्षका साठी फक्त एक नवीन पात्र होते. ज्यांचा कडून कसली ही अपेक्षा न्हवती किंवा कोणतेही परिवर्तन घडेल याची आशा न्हवती. पण गोष्टीला सुरुवात झाली , गोष्ट पुढे सरत गेली आणि जसे आयुष्याचा वाटेवर मित्र होतात तसे हे ६ मित्र आपल्या आयुष्यात अचानक पने जन्माला आले.

नाव बदलली -

पहिल्या आठवड्यात च या अनोळखी कलाकारांच रुपांतर मैत्रीत बदललं. गोष्ट पुढे जशी जशी सरत गेली तशी तशी या गोष्टीतली पात्र घट्ट मित्र झाली. तिथे ती जरी पात्र असली तरी इथे ती खऱ्या जगात अवतरून प्रत्येकाचा ग्रुप मध्ये जगत होती. ग्रुप ची नाव बदलून Dil Dosti Duniyadari झाली, तर काहींची नाव मिनल के फंटर, kk की छोरिया, स्कॉलर इन क्लास पासून ते bunny उर्फ आशू की दुनिया , एना के इडिएट्स , आणि रेश्मा चे पोहे इथ पर्यंत नाव बदलली गेली होती.

Read This हे वाचा –  Bhool Bhulaiya 3

कॉपी झाल्या -

गोष्ट इथेच येऊन थांबली नाही , कारण हा सुरुवातीचा काळ होता , जशी जशी मालिका फुलत गेली तशी तशी ती मनात रुजू लागली. Dil Dosti Duniyadari  मालिका मध्ये जसे घडतं होत तशा घटना मुले खऱ्या आयुष्यात घडवू लागले. मग त्या रेश्मा च्या रडण्या वर जशा बेटी लावायचा तशा इथे ग्रुप मध्ये बेटी लागू लागल्या. जसा kk छेडलेली तार आणि मस्करित केलेला विनोदाचा वार गाजवत होता तशी मूले कॉलेज मध्ये त्याला प्रेरित होऊन स्वतःला kk असल्या सारखे भासवित होती.

Dil Dosti Duniyadari  वर्णन करायला गेलो तर सगळ्याच मित्रांची एक वेगळीच शैली होती जो प्रत्येक जण खऱ्या आयुष्यात अनुभवत होता, जगत होता. या ६ मित्रांनी खूप काही दिलं , यांच्या बद्दल बोलायला गेलो तर नक्कीच एक छोटंसं पुस्तक लिहेन.

तुम्हाला हा Dil Dosti Duniyadari बद्दल चा लेख कसा वाटला ते नक्की कळवा. शक्यतो याचा दुसरा भाग मी लवकरच लिहेन. तुमच्या प्रतिक्रियाच मला दुसरा भाग लिहायला भाग पाडतील अशी अपेक्षा ठेवतो, धन्यवाद.

मालिकेचे विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

1 thought on “Dil Dosti Duniyadari (2024)”

Leave a Comment