Bhool Bhulaiya 3 Horror And Comedy

Bhool Bhulaiya 3 – भूल भुलया 3 या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून भूल भुलया 3 चित्रपट 1 नोव्हेंबर, २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि त्रिपती डीमरी  या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Bhool Bhulaiya 3

Bhool Bhulaiya 3
Bhool Bhulaiya 3

Bhool Bhulaiya 3 आणि परत  एकदा मौंजोलिका –

मौंजोलिका चित्रपटात पुनरागमन करत आहे . या भागातील  कथेत ट्विस्ट येण्याची  मोठी शक्यता आहे. विद्या बालनच्या पुनरागमनामुळे चित्रपटाला एक वेगळा ट्विस्ट मिळणार आहे. पोस्टरमध्ये माधुरी दीक्षितचा कोणताही उल्लेख केलेला न्हावता , पण  Bhool Bhulaiya 3 ट्रेलर नंतर या चित्रपटात माधुरी दीक्षित ची व्यक्तिरेखा चित्रपटातील मौंजोलिका चा भूमिकेत पहायला  मिळणार आहे.

follow us on – https://www.instagram.com/linkofentertainment/

माधुरी दीक्षितची एन्ट्री : मोठा ट्विस्ट

माधुरी दीक्षित या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असून मौंजोलिका चा भूतकाळाशी तिचा  संबंध असू शकतो आणि विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यावेळी या चित्रपटात धुडगूस घालतील यात काही दुमत नाही. हा चित्रपट  प्रेक्षकांना किती  रोमांचित करेल हे बघण खूप आतुरतेच ठरेल.

कार्तिकची भूमिका बदलणार, त्रिपती  महत्त्वाची भूमिका –

भूल भुलैया 2 मध्ये कार्तिकची रूह बाबाची व्यक्तिरेखा फक्त एक तोतयागिरी करणारी होती, यावेळी त्याचे पात्र भुताटकीच्या शक्तींनी रंगवले जाणार आहे. या बदलामध्ये त्रिपती  डिमरीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, कारण ती कार्तिकला भूल भुलैया 1 च्या दुनियेत परत घेऊन जाणार आहे. यासोबतच अक्षय कुमारचा लव्ह अँगल असलेल्या अमिषा पटेलच्या पात्राशी तृप्तीचे कनेक्शन दाखवले जाऊ शकते.

बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका होणार आहे

Bhool Bhulaiya 3 चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर  इतके दमदार आहे की प्रेक्षक त्याच्या कमाईचा अंदाज लावत आहेत. भूल भुलैया 3 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन स्त्री 2 लाही मागे टाकू शकते. जरी हा चित्रपट सिंघम अगेनशी टक्कर देत असला तरी, त्याच्या ओपनिंगपासून 25-30 कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे आणि आजीवन कलेक्शन 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

Read This हे वाचा  – https://linkofentertainment.com/taza-khabar-2-bhuvan-bam-success/

चित्रपटाचे आश्चर्य

Bhool Bhulaiya 3 चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये असे दिसून आले आहे की हा भयपट आणि विनोदाने परिपूर्ण असेल, जे प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करेल. विद्या बालनचा फक्त एक सीन आणि श्रेया घोषालच्या आवाजातील ‘आमी जे तुम्हारे’चे पार्श्वसंगीत प्रेक्षकांना पुन्हा त्या जादुई दुनियेत घेऊन जाईल. कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांची प्रतिभा Bhool Bhulaiya 3 चित्रपटाला आणखी खास बनवेल.

उत्सुकता  -

नुकतेच  रिलीज केलेले भूल भुलैया 3 चे ट्रेलर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. पहिल्या भागाची कथा पुन्हा सुरू झाल्याचे ट्रेलर मध्ये  स्पष्ट दिसते आहे. पहिल्या भागाने प्रेक्षकाणांचा मनात आपली एक वेगळीच  जागा निर्माण केली  होती. अक्षय कुमार यांचा जबरदस्त अभिनय आणि विनोदी शैलीने अभिनयाची वेळ अचूक मांडून प्रेक्षकांना खेळवून ठेवलं होतं

Read This हे वाचा  – https://linkofentertainment.com/paani-adinath-kothare/

चित्रपट निर्माते -

भूल  भुलया  ३ चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अनीस बाजमी यांनी केलिओ आहे. तर या चित्रपटाचे लेखक आकाश कौशिक हे आहेत. चित्रपटाची निर्मिती सय्यद जाइड अली , मुरद खेतानी , भूषण कुमार कृषण कुमार यांनी केली आहे. या चित्रपटाचे बॅक ग्राउंड म्युझिक तनिष्क बागची यांनी केले आहे.

चित्रपटातील कलाकार -

Bhool Bhulaiya 3 चित्रपटात मोठ्या संख्यात कलाकारांची हजेरी लागली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री विद्या बालन , त्रिपती डीमरी , माधुरी दीक्षित या मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. तर सह कलकारांमध्ये  अभिनेता विजय राज , राजपाल यादव, संजय मिश्रा , राजेश शर्मा , विनीत , मनीष वाधवा , अरुण कुशवाह , प्रणीत दास  आहेत.

या चित्रपटातील गाणी प्रीतम चक्रबोरती यांच्या दिग्दर्शनाखाली होणार असून अर्जित सिंग या गायकाचे गाणे देखील या चित्रपटाला लाभले असल्याच सांगण्यात येत आहे. चित्रपटातील छायाचित्रणाची बाजू मनू आनंद यांनी संभाळली आहे. तर चित्रपटांचे संकलन संजय संकला यांनी केले आहे.

Bhool Bhulaiya 3 चित्रपटाचा बजेट - 

भूल भुलया ३ चित्रपटाचे बजेट चक्क १५० कोटी असण्याचे बोलले जात आहे. १५० कोटी रुपयांची गुंतवणूक असून हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालेल यायची शाश्वती चित्रपटाच्या टीम कडून व प्रेक्षकांकडून केली जात आहे. चित्रपटातील vfx चित्रपटातील गाणी, चित्रपटातील वापरलेले गेलेले मोठ मोठी स्टुडिओ अचूक रित्या चित्रपटाचे वर्णन करत आहे .

१ नोव्हेंबर ला चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर च हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे समजेल. माधुरी दीक्षित आणि विद्या बालन या चित्रपटात करमणूक करण्यात यशस्वी होतील की नाही यावर प्रेक्षकांचा भुवया उंचवल्या आहेत.  चित्रपटातील वेशभूषा  अजून अनेक मुख्य कारण असून प्रेक्षकांना  चित्रपटकडे ओढत आहे.

हा चित्रपट दिवाळी मध्ये प्रेक्षकांना भेटायला येत असून एक प्रकारे दिवाळी भेट असल्याच बोलण्यात येत आहे. या भाग प्रेक्षकांना पहिल्या भागासारख हसून लक्षात राहील की नाही माहीत नाही पण कार्तिक आर्यन या भागातून विनोदी व्यक्तिरेखा साकरुण प्रेक्षकांचा मनात नक्कीच घर करेल , यात काही शंका नाही.

चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा – ( credit youtube )

4 thoughts on “Bhool Bhulaiya 3 Horror And Comedy”

  1. Pingback: Pushpa
  2. Pingback: Manapman

Leave a Comment