Pushpa – पुष्पा 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार असल्याचा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडिया माध्यमावर चर्चेत होत्या. अभिनेते अल्लू अर्जुन यांनी चित्रपटाचा पोस्टर 17 ऑक्टोंबर रोजी अधिकृत इंस्टाग्राम माध्यमातून शेअर करत चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची बातमी त्यांनी दिली.
Pushpa 2 बद्दल अल्लु अर्जुन यांचा चाहत्यांमध्ये एक उत्सुकतेची लाट पसरताना दिसत आहे. चित्रपट हा pan INDIA असून इतर भाषांमध्ये ही प्रदर्शित होणार आहे. या मुळेच अल्लु अर्जुन यांचा चाहता वर्ग हा चित्रपट त्यांचा आवडीचा भाषेत हा चित्रपट पाहू शकणार आहेत. पुष्पा च्या पहिल्या भागाने त्या वेळचे बरेच बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडून काडले. पुष्पा च्या पहिल्या भागाने प्रेक्षक वर्गाला आगळा वेगळा अनुभव दिला होता. कमालीचा दर्जेदार अभिनय , ताकदीची गोष्ट आणि ॲक्शन च्या पॉवर पॅक जोडीने ह्या चित्रपटाने संपुर्ण देशात पसंतीचा उच्चांक गाठला होता.
Pushpa –
Pushpa मध्ये अभिनेता अल्लु अर्जून यांच्या सोबत स्त्रीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री रशमिका मंडाना यांनी साथ दिली. रश्मिका आणि अल्लु अर्जून यांची लव्ह स्टोरी या गोष्टीला वा चित्रपटातला एक वेगळा भाग ठरला.
चित्रपटातील कथे बद्दल थोडक्यात वर्णन करायचं झालं तर गोष्ट , सुरू होण्यापूर्वी सगळ्यांना गोष्टीत खेचून घेण्यासाठी पुष्पा चा प्रसिद्ध डायलॉग ने करतो. “पुष्पा नाम सुनकर फ्लोअर समजा क्या फायर हैं मै “, “झुकेगा नही साला” . या चित्रपटातील कथा आणि त्यातून निघणाऱ्या बऱ्याच हिंट आपल्याला या चित्रपटाचा दुसऱ्या भागात काय होईल याची माहिती देईल.
Pushpa and redwood connection –
या गोष्टीची सुरुवात करुया तर या भागाचा सुरुवातीलाच दाखवल्या प्रमाणे भारतापासून दूर असलेल्या जपान देशात एक प्रथा आहे , ज्यात नवीन वर त्याचा होणाऱ्या वधू ला महागडी वस्तू भेट स्वरुपी देतात. आणि जपान मध्ये एक पारंपरिक वाद्य खूप जास्त प्रसिद्ध आहे , ते वाद्य लाल चंदन च्या लाकडा पासून वा चंदन च्या झाडापासून बनवले जाते.
पण चंदन ची झाडे वा लाकडे जपान मध्ये नाही आहेत , त्या साठी जॅपनीज ती चिन कडून निर्यात करून घेतात. पण या लाकडाना चीन मध्ये नेण्यासाठी त्यांना आधी भारतातील मद्रास राज्यातून ट्रान्सपोर्ट केले जातात , आणि ज्या चेक पॉइंट वरून ही ट्रान्सपोर्ट केली जातात तिकडे एक टीम उभारली आहे जिचं नाव सिंडिकेट आहे. जी शेषा चलन च्या जंगल मधून या चंदन च्या झाडांना तोडून जपान पर्यंत निर्यात करतात. आणि याच गोष्टीला दाखवत एन्ट्री होते ती या कथेतल्या नायकाची आणि तो असतो Pushpa .
Follow us on – Instagram
पण चंदन ची झाडे वा लाकडे जपान मध्ये नाही आहेत , त्या साठी जॅपनीज ती चिन कडून निर्यात ( स्मगलीन ) करून घेतात. पण या लाकडाना चीन मध्ये नेण्यासाठी त्यांना आधी भारतातील मद्रास राज्यातून ट्रान्सपोर्ट केले जातात , आणि ज्या चेक पॉइंट वरून ही ट्रान्सपोर्ट केली जातात तिकडे एक टीम उभारली आहे जिचं नाव सिंडिकेट आहे. जी शेषा चलन च्या जंगल मधून या चंदन च्या झाडांना तोडून जपान पर्यंत निर्यात करतात. आणि याच गोष्टीला दाखवत एन्ट्री होते ती या कथेतल्या नायकाची आणि तो असतो पुष्पा.
Pushpa and Keshav –
पुढे पुष्पा एका मिल मध्ये काम करत असतो आणि त्या ठिकाणी काम करताना तो एका खुर्चीवर चहा पियत बसलेला असतो , पण चहा पिताना तो पायावर पाय ठेवून रुबाबात चहा पीत त्या सोबत पाव खातो. त्या वेळी त्या मिलचा मालक येतो आणि आत गेल्यावर तो मालक मॅनेजर ला विचारतो बाहेर हा कोण बसला आहे जो पायावर पाय ठेवून चहा पितो आहे. त्याला काही तरी शिस्त शिकवा.
मॅनेजर येऊन Pushpa ला बोलतो , तू असा का बसला आहेस ,मालक आले आहेत , थोड तरी शिस्तीत रहा. तर पुष्पा मॅनेजर ला उत्तर देतो की हा डावा पाय पण माझा आहे आणि उजवा पाय पण माझा आहे. मग मालकाच्या लुंगीला का खाज सुटली आहे.जे पण करतो तर माझ्या मेहनतीने करतो. तुला माझी पद्धत आवडत नसेल तर मला पण तुझ्याकडे काम नाही करायचं बोलून तो ती मिल मधली नोकरी सोडतो. हे सगळ केशव नावाचा माणूस बघत असतो, पुष्पा सोबत तो पण ती मिल सोडून पुष्पा च्या मागे जातो , आणि पुष्पा ल त्याचा मालक समजतो.
पुढे जाऊन Pushpa दैनिक मजुरी साठी गाडीची वाट बघत असतो. तेवढ्यात तिथे दोन गाड्या येतात. एक असते 100 ची आणि दुसरी असते 1000 ची. पुष्पा केशव ला त्यात फरक काय आहे विचारतो तर केशव त्याला सांगतो. 100 मध्ये राहशील तर कायद्यात राहशील आणि 1000 मध्ये राहशील तर फायद्यात राहशील फक्त जीवाला थोडा धोका आहे त्यात. पुष्पा कसला ही विचार न करता 1000 च्या गाडी मध्ये जाऊन बसतो. ज्या मध्ये ती गाडी मद्रास राज्यातील शेष चलन जंगलात घेऊन जातात.
Read This हे वाचा – like aani subscribe
Pushpa and police interaction –
सगळयात पहिले तिथला पुजारी सगळ्या दैनिक कामगारांची पूजा करतो आणि नवीन कामास सुरुवात करतो. मग ते सगळे लाल चंदन ची झाडे कापू लागतात. या सगळ्या कायद्याचा विरोधात असलेली काम असल्या मुळे इथे पोलिसांची एन्ट्री होते. पण पोलिसांची एंट्री होऊन सुद्धा Pushpa त्याच काम न सोडता तिथून पळ न काढता त्याच काम पूर्ण करतो . पोलिस आल्यावर त्याची विचारपूस करतात पण तो त्यांना तुम्ही जे शोधत आहात ते शोधा आम्हाला त्रास देऊ नका असं बोलतो पण त्यावर पोलीस त्याला जीवे मारण्याची धमकी देतो. पुष्पा पोलिसाला बोलतो वेळ आहे तर निघून जा.
कारण तुम्ही एकटे आहात आणि आम्ही 60 लोक आहोत. त्या वेळी तो पोलीस तिथून जाणेच योग्य समजतो आणि निघून जातो. पण पुष्पा च्या या कारनामा मुळे पुष्पा तिथे नायक ठरतो आणि त्या संघटनेचा लीडर बनतो.त्या नंतर तो पोलीस थोड्या दिवसांनी परत येतो पण यावेळी तो संपूर्ण फौज घेऊन येतो. त्यावेळी पुष्पा ठरवतो जर यावेळी घाबरलो तर नेहमी घाबरून च रहायला लागेल. म्हणून मग ते दगफेक करतात आणि पुष्पा चंदन ने भरलेला ट्रक घेऊन तिथून निघतो. आणि त्याचा मागे पोलिसांच्या गाड्या लागतात.
Read This हे वाचा – Bhool Bhulaiya 3
Pushpa meet shreevalli –
थोड्या वेळाने पुष्पा त्यांचा समोर येऊन उभा राहतो. मग पोलीस त्याला पोलीस चौकीत घेऊन जातात . त्याला तिकडे खूप मारतात पण तो ती चंदन कुठे लपवतो ते सांगत नाही. पुढे जाऊन कोंडा रेड्डी गँग सोबत त्याची भेट होते , त्याला मदत करताना तो दुधाच्या गाडीची कल्पना देऊन तो चंदन ची निर्यात करतो. आणि त्यावेळी कथे मद्ये एन्ट्री होते ती श्रीवल्ली ची . ती दूध विकणारी मुलगी असते. पुष्पा तिच्या प्रेमात पडतो. तिला पटविण्यासाठी पुष्पा चा मित्र केशव श्रीवल्ली ला सिनेमा पाहण्यासाठी 1000 रुपये देतो.
कारण तिकडे 15 रू ची तिकीटे 100 ला विकत असतात. तिला सिनेमा पाहायचा असतो. पण केशव तिला बोलतो मे पैसे देईन पण एक अट आहे. तुला पुष्पा ला बघून स्माईल द्यावी लागेल आणि तिचा मैत्रिणी त्या अट मान्य करून सिनेमा पाहायला जातात. दुसऱ्या दिवशी पुष्पा ठरवतो की जर श्रिवल्ली त्याचा कडे बघितल नाही तर परत कधीच तिचा विचा करणार नाही. तितक्यात श्रीवल्ली तिकडे येते आणि पुष्पा ला बघून हसते. Pushpa खुश होतो आणि इथून सुरू होते पुष्पा आणि श्रीवल्ली ची लव्ह स्टोरी.
samanntha item song -
ही झाली सुरुवातीची गोष्ट पुढे या कथेत संमंथा या अभिनेत्रीचा आयटेम साँग वर डान्स आहे. समंथा यांनी या गाण्यावर नाचण्या साठी चक्क 5 कोटी रुपये घेतले होते. या गाण्यानंतर पुष्पा वेगवेगळ्या लोकांना भेटत जातो. पैशाची आणि इज्जतीची चव त्याला खूप उंचीवर घेऊन जाते. यात तो बऱ्याच गुंडाचा खात्मा करतो.
Read This हे वाचा – Phullwanti
Pushpa climax
पुष्पा चा क्लायमॅक्स स्टोरी बद्दल बोलायचं झालं तर इथेच गोष्ट प्रेक्षकांना एक नवीन खलनायकाची अथवा पोलिसाची ओळख करून देतो. जो असतो भैरव सिंग शेखावत. पुष्पा ला माहीत असत जर नवीन पोलीस आला आहे तर त्याचा सोबत सुरुवाती पासून च चांगला व्यवहार ठेवावा लागेल म्हणून तो स्वतःचा लग्ना च्या तयारीतून पोलीस चौकीत एक पेटी घेऊन जातो. पोलिस त्याला बोलतो काहीं तरी कमी आहे.
पुष्पा ची माणसं पैसे परत नीट मोजतात , Pushpa ची माणसं सांगतात पैसे तर बरोबर आहे ,पण भैरव सिंग बोलतो काही तरी कमी तर आहे.पुढे बोलतो याचा शर्ट पण सफेद आहे आणि माझा पण सफेद पण माहितेय एक फरक कसला आहे , ब्रँड चा फरक आहे. माझा कडे ब्रँड आहे की माझ्या कडे माझ्या बापाचं नाव आहे. त्या रागात त्याचा हाताची मुठी घट्ट धरतो .
Read This हे वाचा – Paani Adinath Kothare
Bhairav Singh x Pushpa
भैरव सिंग त्याला बोलतो मुठ्ठी आवळू नकोस , हात खोल नाही तर बंदुकीने गोळी घालेल. केशव बोलतो पैसे किती कमी पडत आहे साहेब, तर भैरव सिंग बोलतो साहेब नाही सर बोल सर. मला इज्जत देशील तर कायद्यात राहशील आणि स्वतःचा लग्नात पण.यापुढे मी ठरवणार. कोण किती पैसे घेणार किती देणार कुठे आयात निर्यात होणार वैगरे वैगरे आणि मग भैरव पुष्पा ला जायला सांगतो.
पुष्पा त्याचा सगळ्या गोष्टी ऐकतो आणि तिथून निघून स्वतःचा लग्नाला जातो. जेव्हा पण Pushpa ला भैरव चा फोन येतो तेव्हा पुष्पा त्याची सगळी कामं सोडून तो भैरव कडे पैसे द्यायला जातो. एक दिवस असा येतो जेव्हा पुष्पा च लग्न असत श्रीवल्ली सोबत पण पुष्पा लग्नात जायचं जागी भैरव ला भेटायला जातो . ते दोघे एका डोंगरावर बसून दारू पित असतात. दारू पीत असताना पुष्पा भैरव ने त्याचा किती अपमान केला आहे ते सगळं सांगतो. आणि इथेच कथेला थांबवून ठेवणारी गोष्ट घडते.
Read This हे वाचा – Singham Again
Brand -
पुष्पा भैरव ची बंदूक घेऊन त्याचा मुठी ला बंद करून भैरव ल बोलतो त्या दिवशी तू या मुठीत गोळी नाही मारलीस तू चुकलास आणि तितक्यात Pushpa त्याचा मिठीत बंदुकने गोळी मारतो. त्याचा हातातून रक्त यायला लागतं.त्याचा हात तो स्वतःचा पाठीवर मारतो आणि बोलतो त्या दिवशी तू ब्रँड बद्दल बोलत होतास ना .. हे बघ माझ्या रक्तात ब्रँड आहे.. कारण माझं रक्तात माझ्या बापाचं रक्त आहे. आणि हे ऐकून भैरव चा पायाखालची जमीन सरकते.
मग पुष्पा त्याचे सगळे कपडे काढायला सांगतो आणि स्वतःचे पण कपडे काढतो. पुष्पा त्याला बोलतो माणसाची ओळख त्याचा कपड्यांनी नाही तर त्याचा कर्मानी होते. या पुढे कोणतेच व्यवहार तुझ्या कडून नाही होणार , सगळे व्यवहार मीच करणार . तू पोलीस असशील च पण तुझं कोणी काहीच ऐकणार नाही.
Read This हे वाचा – Squid Game 2
Suspense with end
या कपड्यांशिवाय तर तुझा कुत्रा पण तुला नाही ओळखणार. आणि मग Pushpa गाडी घेऊन निघून जातो. पुष्पा चड्डी वर लग्नात पोहचतो. मंडपात पोहचल्यावर त्याची माणसं त्याला कपडे घालतात आणि पुष्पा त्याचं लग्न आटपतो. आणि दुसरीकडे भैरव त्याचा घरी जातो तेव्हा त्याचा कुत्रा त्याचा वर भुकतो, बिना वर्दी त्याचा कुत्रा त्याला ओळखत नाही. एका बाजूला पुष्पा च लग्न होतं आणि दुसरीकडे भैरव त्याचा रागाने जळत असतो. आणि याच जबरदस्त शेवटाने पहिला भाग संपतो.
याच कथेचा पार्श्वूमीवर आता दुसरा भाग येणार आहे तर या भागात नक्की भैरव आणि पुष्पा यांच्यात काय घडेल हे पाहणं उत्सुकता वाढवत आहे.
चित्रपटाचे ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा-
1 thought on “Pushpa”